क्राईम
बायको त्रास देते, मारहाण करते

- पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यूचे प्रकरण अद्याप ताजे आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केल्याने वैष्णवीने आयुष्याचा शेवट केला. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत सध्या तपास सुरु आहे. राज्यातील अन्य भागातही विवाहित महिलांना होणाऱ्या त्रासाच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या आहेत. त्याचवेळी पुण्यात मात्र एक वेगळे आणि धक्कादायक प्रकरण घडले आहे.
- पुण्यातील कोरेगाव मुळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. सूरज पवार (वय 32) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूरजने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला होत असलेल्या त्रासाची माहिती रेकॉर्ड केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
- दरम्यान याप्रकरणी सूरजची पत्नी मयुरी पवार (वय 26 ) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. सततच्या भांडणामुळे आणि मारहाणीमुळे सूरज आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. सूरज आणि मयुरी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते लग्नानंतर कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते. दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणांमुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, अशी तक्रार सूरजच्या वडिलांनी केली आहे.



