सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर विमानतळाचे दिमाखात उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. ज्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि सोलापूर पर्यटक, व्यावसायिक कामांसाठी येणारे प्रवासी आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होईल. पीएमओच्या म्हणण्यानुसार, सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे वार्षिक सुमारे 4.1 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी नूतनीकरण करण्यात आले.
यावेळी मोदी म्हणाले, आज भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भाविकांना आपुलकीची भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट हवाई जोडणी देण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. 

प्रवाशांसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे त्याची गती कमी होऊ नये, यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत. आता एक लक्ष ठेऊन पुढे जायचे आहे, विकसित महाराष्ट्र, विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. 

Related Articles

Back to top button