राजकीय

…. तर तुमचा राजकीय एन्काउंटर करु

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही आंदोलन हाताळण्याची पद्धत खूप घातक आहे. तुम्ही तुमच्याच लोकांचाच घात केला. तुम्ही पक्षात वर येण्यासाठी कोणत्या थराला गेलात, हे सांगायची गरज नाही. शहा यांनी बरेच राजकीय एन्काउंटर केलेत. पण मराठा आरक्षण आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळले तर तुमचेच राजकीय एन्काउंटर होईल, अशा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
    मराठ्यांचे आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, अशा आशयाचे विधान शहा यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना जरांगे यांनी शहा यांच्यावर सडकून टीका केली. पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केले हे आम्हाला माहिती आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केले? दमणमध्ये काय केले? अंदमानमध्ये काय केले? स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केले, हे आम्हाला माहिती आहे. माझ्या मराठ्यांचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.
    ज्यांनी पक्षासाठी आयुष्य झिजवले त्याच नेत्यांना तुम्ही बाजूला केले. शहा तुमची ही पद्धत इकडे चालणार नाही, अन्यथा तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Related Articles

Back to top button