क्राईम

बदलापुरात पुन्हा खळबळ!

बदलापूरमधील दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तेथील शाळा चर्चेत आहेत होती. आता पुन्हा एकदा बदलापुरातील त्याच शाळेतील विद्यार्थिनीसंबंधीची बातमी समोर आली आहे.  बदलापूर येथील ‘त्या’ शाळेतील एक मुलगी घर सोडून गेली होती, ती छत्रपती संभाजीनगर शहरात सापडली आहे.
वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची 15 वर्षांची मुलगी घर सोडून बाहेर पडली. रेल्वेने ती शुक्रवारी रात्री दोन वाजता शहरात आली होती. शनिवारी दिवसभर स्थानकावर बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली. दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले.


बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तिने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलीच्या आईने दुसरे लग्न केले आहे. सावत्र वडील तिला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून ती गुरुवारी रात्री मोबाइल बंद करून घर सोडून निघून आली. दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. दामिनी पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.  

Related Articles

Back to top button