राजकीय

ब्रेकिंग! शरद पवार सुसाट

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी जोरदार पक्षबांधणी सुरू केली असून सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. तानाजी सावंतच्या पुतण्यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवारांच्या गळाला आणखी एक राजकीय पुतण्या लागला आहे. या पुतण्याने त्याच्या आमदार काकांविरोधातच विधानसभेसाठी दंड थोपटले असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी तयारी सुरू करत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत.

शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांच्या संपर्कात असून आता अजून एका पुतण्याने काकाविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. धनराज शिंदे यांनी माढा विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आपल्या चुलत भावाच्या किंवा चुलत्याच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Back to top button