सोलापूर

सोलापूर! दहिटणेत मोठा राडा

सोलापूर (प्रतिनिधी) पाण्याचा नळ काढण्याच्या कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तुम्हाला आज सोडणार नाही,तुम्ही जास्त नाटक करत आहात असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली.

याप्रकरणी सोनाली शुभम व्हटकर (वय-१९, रा. मेहता नगर, दहिटणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास व्हटकर,पुष्पा रामदास व्हटकर, धीरज रामदास व्हटकर व चंदन रामदास व्हटकर (सर्व. रा.मेहता नगर दहिटणे) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button