सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मार्केट यार्ड येथे भयंकर चोरी

सोलापूर (प्रतिनिधी) मार्केट यार्ड येथील जाजू इंटरप्राईजेस या दुकानातील मागील गोडाऊनच्या शटरचा कडी-कोंयडा कशाने तरी कट करून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करत ३ लाख ६४ हजार १५० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना २६ ते २७ सप्टेंबर दरम्यान घडली.याप्रकरणी दिनेश जुगलकिशोर जाजू (वय-४१,रा. भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पळसळकर हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button