क्राईम
ब्रेकिंग! बदलापूर एनकाऊंटर प्रकरणात गडबड

बदलापूर येथील शालेय दोन मुलींशी झालेल्या गैरकृत्य प्रकरणात अटक असलेला संशयित आरोपी अक्षय शिंदे याचे ठाण्यात एन्काऊंटर झाले. यादरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय याच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रश्नप्रथमदर्शनी या एनकाऊंटर प्रकरणात गडबड असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय समोर आला आहे. अक्षयच्या वडिलांनी या चकमकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने चकमकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात काहीतरी गडबड असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
अक्षयला तळोजा कारागृहातून ताब्यात घेताना आणि घटनेच्या वेळीचे सर्व दुकानांचे सीसीटीव्ही तात्काळ सुरक्षित करावेत, असे अक्षयच्यावतीने वकील अमित कटारनवरे यांनी हायकोर्टात सांगितले.



