क्राईम

भाजप नेत्याची ४५ वर्षीय बायको पळाली

उत्तर प्रदेश येथील भदोहीमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भाजपा नेत्याची पत्नी पोलीस हवालदार प्रियकरासह पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित महिला ही भाजपाची सदस्य असून यापूर्वी तिने स्थानिक अध्यक्षपदाची निवडणूक लढलेली आहे. धक्कादायक म्हणजे पळून जाताना तिने सोबत अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकडही सोबत नेल्याचा आरोप आहे.
ही ४५ वर्षीय महिला तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. सोबत तिने एका मुलाला नेले असून दोन मुलांना मागे सोडल्याची माहिती आहे. ३० वर्षीय हवालदार हा भाजपा नेत्याच्या घरातच भाडेकरु म्हणून राहत होता. 

यामध्ये अडीच कोटींचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पत्नी हवालदारासह घरातून पसार झाल्याचा दावा पतीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. हवालदाराने पैशांसाठी आपल्या पत्नीला फूस लावल्याचा आरोपही त्याने केला आहे. हवालदार तिच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो, अशी चिंताही पतीने व्यक्त केली आहे. 

दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिला आणि हवालदाराचा शोध सुरू केला आहे.
गोपीगंज नगर येथील भाजपा नेत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, साधारण एक वर्षापूर्वी गोंडा येथील विनय तिवारी (उर्फ राज तिवारी) या हवालदाराने त्यांच्या घरात एक खोली भाड्याने घेतली होती. 
त्याच्या नकळत हवालदार आणि त्याच्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू झाले. हवालदाराने धूर्तपणे पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ब्लॅकमेल केले. ही बाब उघड केल्यास कुटुंबाला खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिल्याचा दावाही तक्रारदार पतीने केला आहे.

Related Articles

Back to top button