महाराष्ट्र
स्वत:च्या हाताने सत्ता घालवू नका

मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असे जरांगे म्हणाले.
फडणवीस यांना आमची विनंती आहे की, आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचे नाही. आमच्या समाजालाही जायचे नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे, त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपले नुकसान करु नका. मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितके सोप नाही, असा इशाराच एका प्रकारे जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये, असेही जरांगे म्हणाले.



