क्राईम

ब्रेकिंग! अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात नवी घडामोड

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे म्हणाल्या की, जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते, तेव्हा ती पायावर झाडली जाते. मात्र जेव्हा पोलीस गोळी झाडतात तेव्हा ती थेट डोक्यात लागते. हे समजण्याच्या पलीकडचे आहे. या प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाला राज्य सरकारच्या प्रभावापासून लांब ठेवले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

अक्षय शिंदे हा कोणी संत किंवा समाजसुधारक नव्हता. त्याला फाशीच व्हायला हवी. पण ती फाशी होताना लोकांच्या मनात कायद्याचा धाक आणि आदर कायम राहिला पाहिजे. अशा प्रकारामुळे कायद्याचा धाक रहात नाही. काल एन्काउंटर झाल्यावर लगेच एक पोस्टर व्हायरल झाले. न्याय असाच हवा, पोलिसाची टोपी आणि खाली धर्मवीर २ लिहिले होते. चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केले का? असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button