क्राईम

ब्रेकिंग! वीस तासांत दुसरा एन्काऊंटर

बदलापूरमधील एका खाजगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (23) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. उत्तरप्रदेशमधील गाझीपूरमध्ये, दोन आरपीएफ जवानांची हत्या करून त्यांचे मृतदेह चालत्या ट्रेनमधून फेकल्याच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद जाहिद, यूपी एसटीएफ आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार जाहिद उर्फ सोनू यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकासह त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. दिलदारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमानिया-दिलदारनगर रस्त्यावर ही चकमक झाली. चकमकीत मारला गेलेला गुन्हेगार आरपीएफ जवानांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता.
दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी गाझीपूरमध्ये दोन आरपीएफ जवान शहीद झाले होते. गहमर पोलीस स्टेशन हद्दीतील बकानिया गावाजवळ दोन्ही आरपीएफ जवानांचे मृतदेह सापडले. दोन्ही आरपीएफ कर्मचारी पीडीडीयू रेल्वे यार्ड पोलीस ठाण्यात तैनात होते आणि ते बारमेर एक्स्प्रेसने मोकामा प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. दारू तस्करांनी आरपीएफ जवानांना बेदम मारहाण करून दोघांनाही ट्रेनमधून फेकून दिले होते. आरपीएफ जवान प्रमोद सिंग आणि जावेद अहमद यांची हत्या करून आरोपी फरार झाला होता. या प्रकरणात पाच गुन्हेगारांना यापूर्वीच अटक करण्यात आली. तर एका गुन्हेगाराला चकमकीत जखमी झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. याचदरम्यान सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत ठार झालेला गुन्हेगार मोहम्मद जाहिद उर्फ सोनू याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.  

Related Articles

Back to top button