क्राईम
बिग ब्रेकिंग! बदलापूरचा अत्याचारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

बदलापूरमध्ये शाळेतील लहान मुलींवर अत्याचार प्रकरणात अटक असलेला आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयने स्वतःवर गोळी चालवली.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेला एक पोलिस देखील गंभीर जखमी झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याचा मृत्यू झाला आहे.
अक्षय शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय यांचा मृत्यू झाला आहे.