क्राईम

अंगावर वर्दी अन् कमरेला पिस्तूल

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस होण्याची स्वप्नं पाहणारी मुले वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतात. कुटुंबापासून दूर राहून, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात. यातील सर्वांचीच स्वप्नं पूर्ण होतात असे नाही.

मात्र, बिहारमधील एका १८ वर्षीय तरुणाने यातले काहीही न करता दोन लाख रुपयांच्या बदल्यात आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिथिलेश कुमार असे या ‘उद्योगी’ तरुणाचे नाव आहे. हा पठ्ठ्या कसलीही परीक्षा न देता दोन लाख रुपये देऊन ‘अधिकृत गणवेश’ आणि पिस्तूल मिळवून आयपीएस अधिकारी म्हणून मिरवत होता. नॅशनल क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अधिकृत एक्स हँडलवरून मिथिलेश कुमारचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तो गणवेशात दिसत आहे.
बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे. मनोज सिंह नावाच्या व्यक्तीने मिथिलेशला आयपीएस बनवण्याचे आमिष दाखवले आणि दोन लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. मनोज एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मिथिलेशला पूर्ण युनिफॉर्ममध्ये स्थानिक पोलिस ठाण्यात पाठवले.

पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी जेव्हा मिथिलेशला पाहिले. त्यांनीही गमतीने त्याचे स्वागत केले. ‘या, आयपीएस सर!’ सिकंदरा पोलीस ठाण्यात तुमचे स्वागत आहे, असे तिथले अधिकारी म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेबद्दल तरुणाकडून सर्व माहिती घेतली.

Related Articles

Back to top button