सोलापूर
सोलापूर! सात रस्ता येथील अपघात प्रकरणात मोठी अपडेट

सोलापूर (प्रतिनिधी) भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने डंपर चालवून दुचाकी क्रं.एमएच.१३.सीडब्लू.३७६९ यावरील चालक बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी (वय-८१,रा.गणेश नगर, योगक्षेम सोसायटी, जुळे सोलापूर) यांना पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर क्रं.एमएच.१३.डीक्यू.६८५६ यातील चालक फरीद नशीर शेख (वय-३५, रा.मु.पो.उळेवाडी ता.उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश बाळासाहेब कुलकर्णी (वय-४५, मु.पो.जेऊर, ता.अक्कलकोट) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून फरीद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान चितळे हॉस्पिटल समोर सात रस्ता येथे घडली. पुढील तपास पोसई.पाटील हे करीत आहेत.