क्राईम
ब्रेकिंग! खून केल्यानंतर पसार झाला, पण…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर (वय 33) याला गुन्हे शाखेने काल अटक केली. दरम्यान बेल्हेकरला न्यायालयाने 24 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वनराज यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून झाला.
वनराज यांची बहीण संजीवनी, मेहुणे प्रकाश, जयंत, गणेश, काेमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. वनराज यांचा खून झाल्यानंतर नाना पेठेतील समाधान चौकात राहणारा बेल्हेकर पसार झाला होता. बेल्हेकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तो नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळीतील आहे. ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड मित्र आहेत.
वर्षभरापूर्वी झाालेल्या निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आरोपी कोमकर, गायकवाड आणि बेल्हेकर यांनी आंदेकरांचा खून करण्यासाठी कट रचल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.



