सोलापूर
सोलापूर! बाईकवरून आले, भलताच कांड केला

सोलापूर (प्रतिनिधी) दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने एका महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसका मारून चोरून नेल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्रोळीकर नगर वेलनेस मेडिकलच्या बोळात होटगी रोड येथील घराच्या गेट समोर घडली.
याप्रकरणी कनिष्का संजय धामेचा (वय-३५, रा. अंत्रोळीकर नगर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी कनिष्का या त्यांची मुलगी प्रार्थना हिला अँपल स्कूल अंत्रोळीकर नगर होटगी रोड येथे शाळेत सोडून येत असताना त्यांच्या घरासमोरील मेन गेट जवळ अज्ञात एका इसमाने दुचाकीवरून येऊन कनिष्का यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने हिसका मारून तोडून पळून गेला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड हे करीत आहेत.