राजकीय

ब्रेकिंग! नितीन गडकरी छा गये, म्हणाले…

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. जागावाटपा संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वारंवार बैठका देखील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्या नेत्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही, ते पक्ष सोडून जात आहे. 
याशिवाय काही ज्येष्ठ नेत्यांकडून आपल्या मुलां-मुलींसाठी तिकीट मागून घराणेशाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा घराणेशाहीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपरोधिक टीका केली आहे. 
ते नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. नेते आधी आपल्या मुलासाठी, मुलीसाठी आणि पत्नीसाठी तिकीट मागतात. कारण मतदार या लोकांना मतदान करतात म्हणून ते तिकीट मागतात. ज्या दिवशी मतदार घराणेशाहीतून आलेल्यांना मतदान करणार नाहीत, त्यादिवशी एका मिनिटात सर्व सरळ होतील. कुणाचा मुलगा किंवा मुलगी होणे हे काही पुण्य आणि पाप नाही. पण प्रत्येक राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने किंवा मुलीने स्वतःला सिद्ध केले पाहीजे आणि लोकांनी म्हणायला हवे की, यांना निवडणुकीला उभे करा, असे विशेष टिप्पणी गडकरींनी केली.
दरम्यान, राजकीय कारकिर्दीवर बोलताना गडकरी म्हणाले की, मी 45 वर्ष राजकारणात आहे. या काळात मी कुणाच्याही गळ्यात हार घातला नाही किंवा या काळात माझ्या स्वागतालाही कुणी आले नाही आणि सोडायलाही आले नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणायचो की, माझ्याबरोबर कुत्रही येत नाही. पण आता कुत्राही यायला लागलाय. 
कारण झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे मी कार्यक्रमाला जाण्याआधी त्याठिकाणी आधी कुत्रा फिरून येतो. तसेच मी कुणाचे पोस्टरही लावत नाही आणि बॅनरही लावत नाही. लोकांनाही सांगून ठेवलंय, तुम्हाला काही द्यायचे असेल तर मत द्या. तुम्ही मला मत दिलात तरी मी तुमचे करणार आणि नाही दिले तरी काम करत राहणार, असे सूचक वक्तव्य गडकरी यांनी केले.

Related Articles

Back to top button