राजकीय

ब्रेकिंग! राज्यात राजकीय भूकंप

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली.
कोल्हापूर येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा करण्यात आली. २६ सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. 
तसेच महायुतीमधून बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. 
मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Back to top button