देश - विदेश

ब्रेकिंग! ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार कायमचे रद्द

  1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी कुटुंबियांसाठी पीओएस मशीनद्वारे नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे आवश्यक आहे. याद्वारे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची ई-केवायसी बायोमेट्रिक तपासणी केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आलेले आहे आणि त्यांच्या आदेशाचे पालन केले बंधनकारक केलेले आहे.
    केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे लोक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना इथून पुढे रेशन दिले जाणार नाही. तसेच जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्डदेखील रद्द केले जाईल.
    30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही तर तुम्ही पुढील महिन्यात धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे ई केवायसी करणार नाही. त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. जर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून तुमची नावे वगळली, तर तुमचे रेशन कार्डदेखील रद्द केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई केवायसी केले नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते.

Related Articles

Back to top button