सोलापुरात भलताच प्रकार
सोलापूर – लग्नात वडिलांनी ब्रॅण्डेड वस्तू दिल्या नाहीत.त्याचप्रमाणे जिम टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये व विवाहितेच्या अंगावर घातलेले सात तोळे सोने पतीला दिले नाहीत म्हणून मारहाण करून विवाहितेच्या दोन छोट्या मुलांसह माहेरी हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १० जुन २०२० ते २० मे २०२५ पर्यंतच्या दरम्यान नई जिंदगी शोभादेवी नगर येथे घडली. याप्रकरणी वाजिया जैद पिरजादे (वय-२३, रा. कुमठा नाका) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जैद साजिद पिरजादे, अफसाना साजिद पिरजादे, साजिद अमीनुद्दीन पिरजादे, मजीद साजिद पिरजादे, तेहसिन मोबीन शेख (सर्व.रा. नई जिंदगी, शोभा नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इनामदार हे करीत आहेत.