क्राईम
राज्यात दुहेरी हत्याकांड
राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन पथरोड याचा उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
शहर पोलीस स्टेशनला अद्याप अधिकृत माहिती आली नसली तरी पोलीस सूत्राकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
माजी नगरसेवक बारसे व सामाजिक कार्यकर्ते राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील जुना सातारा रोडवरून रस्त्याने कारमधून येत होते. त्यावेळी जुन्या वादातून राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केला होता.
यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलीसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तर इतर मारेकरी फरार झाले.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपींना नंदुरबार येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. यातील आरोपी नितीन याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडल्याने त्याच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असतांना काल रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.