महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांच्या खात्यात दीड हजार रूपये जमा होत आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला, तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करून तीन हजार रूपये करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाडक्या बहिणींना दिला आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिंदे यांनी हे विधान केले. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला मोठा जनादेश दिला तर सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून तीन हजार रुपये करेल, असे विधान शिंदे यांनी केले आहे.