क्राईम
ब्रेकिंग! त्या तिहेरी हत्याकांडाची उकल

राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान कर्जतयेथील चिकनपाडा पोशीर पाडा येथील तिहेरी हत्याकांडाची उकल झाली असून सख्या भावानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एकाला कर्जत पोलीसांनी अटक केली आहे.
अजय देवगण याचा दृष्यम चित्रपट बघून त्याने भावाच्याच कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
हनुमंत पाटील असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. चिकनपाडा गावाच्या हद्दीतील पोशीरपाडा या भागातील मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील आणि विवेक मदन पाटील यांचा खून झाला असल्याचे रविवारी निष्पन्न झाले. बोरगाव येथील मूळ रहिवासी असलेले मदन पाटील आणि त्याचा भाऊ हनुमंत पाटील हे गेली १५ वर्षे चिकनपाडा गावाच्या हद्दीतील पोशीर पाडा येथे घर बांधून राहत आहेत.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दहा वर्षीय विवेक याचा मृतदेह नेरळ कळंब रस्त्याखालून वाहणार्या नाल्यातील पाण्यात आढळून आला होता. त्यानंतर ३० वर्षीय अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह देखील त्याच नाल्यातील पाण्यात आढळून आल्यावर ३५ वर्षीय मदन यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. मुंबई येथील जे जे रुग्णालयात शव विच्छेदन करून आणलेल्या तिन्ही मृतदेहांवर बोरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून मोठा भाऊ, भावजय आणि पुतण्या यांच्या हत्याकांड प्रकरणी हनुमंत याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत