तरुणांसाठी आनंदाची बातमी!

रेल्वेमध्ये सध्या अप्रेटिंस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. आरआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्जप्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या भरतीमध्ये १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवारांनी rrcrecruit.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.
रेल्वेच्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक,कारपेंटर, लाइटमॅन, वायरमॅन, पेंटर अशा पदांसाठी ही भरती आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती ३३१५ पदांसाठी करण्यात येणार आहे.
रेल्वे अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असायला हवे. याबाबस सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करावेत.