क्राईम

ब्रेकिंग! वनराज आंदेकर खून प्रकरणाला नाट्यमय वळण

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काल रात्री १३ संशयिताना रायगड जिल्ह्यातून अटक केली. यामध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत. या सर्वांना पुण्यात आणण्यात आले. अशामध्ये वनराज यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोमनाथने वनराज यांची हत्या करण्यामागचे खरे कारण देखील समोर आले आहे.
वनराज हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. सोमनाथ हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. 

या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी आधीच वनराज यांच्या दोन बहिणी, दोन मेहुणे आणि सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे. हे पाचही आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहेत. आता या प्रकरणात आणखी १३ संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Related Articles

Back to top button