राजकीय

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार!

एकनाथ खडसेंच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महायुतीचे मोठे नेते महाविकास आघाडीध्ये सामील होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. खडसेंनी असे वक्तव्य केले आहे, यावरून ते भाजपवर नाराज असून ते शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे.
आज राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या संपर्कातही अनेक नेते आहेत. महायुतीचे किती मोठे नेते महाविकास आघाडीत येत आहेत, हे लवकरच कळेल.

Related Articles

Back to top button