क्राईम

पुण्यातील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टी, मनसेची अचानक धाड

पुण्यात पब्स आणि रेस्टॉरंट्समध्ये अल्पवयीन मुलांना अवैधपणे मद्य विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील ‘किकी’ नावाच्या पबमध्ये नामांकित कॉलेजमधील तरुण-तरुणींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘फ्रेशर्स पार्टी’ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) बंद पाडली.

या पार्टीत पब चालक अल्पवयीन मुलांना दारू विकत होते, असा आरोप मनविसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पब चालकांनी कोणतीही ओळखपत्र तपासणी केली नाही किंवा प्रवेशाची नोंद ठेवली नाही. 17 ते 21 वयोगटातील अनेक विद्यार्थ्यांना सहज प्रवेश देण्यात आला होता. या कारवाई दरम्यान, मनविसेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. मनविसेने हा गैरप्रकार उघडकीस आणत ही पार्टी तातडीने बंद पाडली.

Related Articles

Back to top button