क्राईम

ब्रेकिंग! वनराज आंदेकरांच्या हत्येचा मास्टरमांईड कोण?

  • माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
    वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वनराज यांच्या दोन बहिणी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
    वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Back to top button