क्राईम
सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा!

- राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत काल छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर पत्ते आणून टाकल्याचा प्रकार घडला आहे.
- यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
- विशेष म्हणजे मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत. यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मारहाणीत चव्हाण असतील तर ते चूक आहे. मी याचे कधीच समर्थन करणार नाही, असे तटकरे म्हणाले.
- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी हा गेम खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरले आहे तटकरे यांनाही लातूरमध्येही अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले. ते लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांच्याजवळ येत टेबलवर पत्ते टाकले आणि कृषीमंत्र्यांना हे द्या.
- पत्ते खेळू नका, असे सांगण्याचे आवाहन केले. यावेळी कोकाटे यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणीही या पदाधिकाऱ्याने केली. या घटनेनंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत छावा संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.



