खेळ

ब्रेकिंग! ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा या संघात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, समितचा भारताच्या अंडर-१९ संघात समावेश करण्यात आला आहे. 
  • भारतीय अंडर-१९ संघाला ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्ध एकदिवसीय आणि ४ दिवसीय सामने खेळायचे आहेत. या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी समितला टीम इंडियात संधी मिळाली आहे. 
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यूपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ४ दिवसीय सामन्यांच्या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. समितबद्दल बोलायचे तर तो नुकताच महाराजा टी-२० ट्रॉफीमध्ये खेळला आहे.

Related Articles

Back to top button