बिजनेस

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि…

  1. सोलापूरसह अन्य भागातील नागरिकांना सध्या महागाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, प्रत्येक व्यक्ती कमाईचा एक हिस्सा भविष्यासाठी बाजूला ठेवत असतो. अडचणीच्या क्षणी हाच पैसा कामी येतो. मात्र, गुंतवणूक नेमकी कुठे करावी, त्याचा परतावा जास्त असेल की नाही?, याबाबत अनेक प्रश्न पडतातच. अशात बाजारात देखील गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात.
    सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या योजनामध्ये पैसे गुंतवणूक करायचे असतील तर पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 15 वर्षांच्या कार्यकाळातील ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला कोट्यधीश बनवू शकते. या योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7.1 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज कमी-जास्त होऊ शकते. यासोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात. कोणतीही व्यक्ती पीपीएफमध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकते आणि किमान ठेव मर्यादा वार्षिक 500 रुपये आहे.
    ही योजना 15 वर्षांत मॅच्युअर होत असली, तरी ती 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवता येते. म्हणजेच, तुम्हाला किमान 25 वर्षांसाठी वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. एकूण 25 वर्षांत तुम्ही एकूण 37,50,000 रुपये या योजनेत गुंतवाल. 7.1 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह 25 वर्षांनंतर तुम्हाला तब्बल 1,03,08,015 रुपये मिळतील. 

Related Articles

Back to top button