महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेमुळे महिला होणार कोट्याधीश?

राज्य सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत.
सरकारकडून प्रत्येक महिन्याला मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या माध्यमातून राज्यातील महिला कोट्याधीश होऊ शकतात. त्यासाठी महिलांना एक काम करावे लागणार आहे. जर महिलांनी प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये म्यूच्युअल फंडमध्ये एसआयपी केल्यास दहा वर्षांनी 12 टक्के रिटर्नसह त्यांना जवळपास 2,32 लाख रुपये मिळू शकतात. तर 15 टक्के रिटर्नसह ही रक्कम जवळपास 2.76 लाख रुपये होऊ शकते. म्यूच्युअल फंडच्या अनेक गुंतवणूकीत रिटर्न 18 टक्क्यांपर्यंत राहते. असे झाले तर तुमची रक्कम जवळपास 3.36 लाख रुपये होण्याचा अंदाज आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच तुम्ही कोट्याधीश होऊ शकता, ही माहिती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. यासाठी तुम्हाला 40 वर्षांपर्यंत एसआयपी सुरु ठेवावी लागेल. यानुसार हिशोब केला तर एक हजार रुपयांची एसआयपी 40 वर्षांपर्यंत केल्यावर जवळपास 1.18 कोटी रुपये मिळू शकतात. हा हिशोब 12 टक्के रिटर्नच्या आधारावर केला आहे. 

Related Articles

Back to top button