महाराष्ट्र
ब्रेकिंग! नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

- अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच राहत्या घरी पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्लाप्रकरणी अटक करणात आलेल्या मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजादला वांद्रे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच प्रथमदर्शीनी हा आरोपी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर आता राज्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
- आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आरोप केला की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचे मतदान मिळवण्यात आले. इतक्या वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण बांगलादेशींना मुंबईत येण्यापासून रोखले नाही.
- कारण हिरव्या सापांना दूध पाजणारेच मातोश्रीवर वावरतात, असे म्हणत त्यांनी कुणाच्या आशिर्वादाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचे मुंबईत वास्तव्य वाढले? असा प्रश्न देखील विचारला. तसेच आमच्या सरकारवर बोलण्याअगोदर आदित्य यांनी ही घाण साफ करावी, असे आवाहन राणे यांनी केले.
- बांगलादेशी जर नाव बदलून महाराष्ट्रात राहत असतील, तर त्यांनी आता त्यांचा बोरा बिस्तरा गुंडाळावा.
- कारण आम्ही कोणालाही सोडणार नाही. खरे तर बांगलादेशी लोकांना भारत इस्लामिक राष्ट्र करायचे आहे. असे असतानाही बांगलादेशी लोकांना भारतात आधार कार्ड कागदपत्र देणार मोठे जाळे आहे. मात्र आता यात बडे मासे अडकणार आहेत. तसेच बांगलादेशी मुसलमानान दूर करणे हे सगळ्याच काम असले पाहिजे, असे आवाहन राणे यांनी केले.