क्राईम

टिकटॉक स्टार सना युसूफची इस्लामाबादमध्ये हत्या

  • टिकटॉक स्टार सना युसूफची घरात घुसून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये सनाची हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जी-13 सेक्टरमधील सनाच्या घरात घुसून तिच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेले.
  • पाकिस्तान पोलिसांना संशय आहे की, हल्लेखोर सनाचा ओळखीचा होता आणि तो घरात पाहुणा म्हणून घुसला होता. सनावर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही तसेच हत्येचे कारणही समोर आलेले नाही.
  • सना ही पाकिस्तानी टिकटॉक स्टार होती. जिचे लाखो फॅन्स होते आणि तिची लोकप्रियता सतत वाढत होती. परंतु रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मुलीची पाकिस्तानात घरात घुसून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सनाचे दोन फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये ती हसत आहे आणि दुसरा फोटो रक्ताने माखलेले आहे.

Related Articles

Back to top button