क्राईम
मद्यधुंद तरुणींचा भर रस्त्यात धिंगाणा!

- एका चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घालत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या थेट शिवीगाळ करत होत्या. लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण तरीही त्या आपल्या तोंडाची हवा करत होत्या. त्यात संबंधित तरुणी आपला भाऊ डॉन असल्याचा दावा करत होत्या. शिवाय तो मर्डर सुद्धा करतो, अशी धमकीही रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना देत होत्या. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
- व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत दोन तरूणी दिसत आहेत. हा व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज या भागातला असल्याचे सांगितले जात आहे. आम्हाला पोलीसही काही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत, असे या तरुणी सांगत होत्या. तसे व्हिडीओमध्येही रेकॉर्ड झाले आहे. बरं त्या ऐवढ्यावर थांबलेल्या नाहीत. त्यांनी आपण दारू का प्यायली आहे याचे कारणही त्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत आहेत.
- आपण केवळ टेन्शनमुळे दारू प्यायली आहे, असे त्यांनी सांगितले. मद्यधुंद अवस्थेत त्या दोघीही सार्वजनिक शांतता भंग करत होत्या. नागरिकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूरच कायम ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.



