रस्त्यावरून गाडी चालवताना करता ही चूक, दहा हजार रुपये दंड

सध्या सोलापूरसह अन्य शहरांमध्ये वाहतुकीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून तुमची गाडी त्यापुढे उभी केल्यास ते सामान्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. ही कृती वाहतूक नियमांचे उल्लंघन असून तुम्हाला पाचशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. बाईक आणि चारचाकी वाहनांसाठी देखील या नियमाचे उल्लंघन केल्यास अशी दंडाची तरतूद आहे.
रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जातो. नवीन मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत हा दंड आकारण्यात येतो. या कायद्यात रस्त्यांचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
नवीन मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 अंतर्गत वाहतूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. आरसीशिवाय गाडी चालवल्यास या कायदा अंतर्गत पाच हजार रुपये दंड आकारला जातो. नव्या वाहतूक नियमात आरसीशिवाय गाडी चालवणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो.
जर एखादी व्यक्ती पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडली गेली तर मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत दहा हजार रुपयांचे चलन फाडले जाते. याशिवाय सहा महिन्यांची शिक्षाही होऊ शकते. प्रकरण गंभीर असल्यास दंड व तुरुंगवास होऊ शकतो. दारू पिऊन गाडी चालवल्यास यापूर्वी दोन हजार रुपयांचे चलन फाडले जायचे.