महाराष्ट्र
‘ते’ धनंजय मुंडेंचेच प्लॅनिंग

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांची मंत्री धनंजय मुंडेंशी असलेल्या जवळीकमुळे त्यांच्यावर वारंवार आरोप केला जात आहे. तसेच मुंडेंकडून मंत्रीपद काढून घेण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
- देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? यावरून मागच्या काही दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. अखेर मुंडे यांना पालकमंत्रीपदावरून डावलण्यात आले आहे.
- सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.
- बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादा कारभार पाहणार आहेत. आता बीडचे पालकमंत्रीपद अजितदादा पवारांकडे जाणे, यामागे स्वत: मुंडे यांचे प्लॅनिंग असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा खुलासा स्वत: मुंडे यांनी केला आहे.
- बीडची सध्याची परिस्थिती बघता बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजितदादांनी स्विकारावी, अशी विनंती मीच केली होती. पुण्याचा जसा विकास झाला, तसाच विकास बीडचा व्हावा, अशी माझी भावना आहे, अशी माहिती मुंडे यांनीच दिली आहे.