ब्रेकिंग! चप्पल, बनियान घालून बाईक चालवल्यास दंड?

देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावेच लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात. सध्या सोलापूर शहर व परिसरात वाहतुकीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहेत. दरम्यान बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीनेदेखील डोक्यावर हेल्मेट घातले पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवतात. अशा परिस्थितीत चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असे अनेकांचे मत आहे. पण हे खरे आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास दंड होईल, अशी कोणतीही अट मोटर वाहन कायद्यात नाही. असा कोणताही नियम कायद्यात नाही. त्यामुळेच चप्पल अथवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास चालान कापले जात नाही, म्हणजेच दंड होत नाही. गडकरी यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. चप्पल घालणे, अर्ध्या बाह्यांचे शर्ट, लुंगी -बनियान घालून बाईक चालवणे, गाडीचा आरसा खराब असणे अथवा गाडीत एक्स्ट्रॉ बल्ब नसणे अशा गोष्टींमुळे चालान कापला जात नाही. परिणामी अफवांपासून सावध रहावे, असे गडकरी यांनी सांगितले आहे.