क्राईम

गर्भवती मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले…

  • पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सचिव सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
  • गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
  • या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळून आली आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलने केले गेले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांनी खूप मेहनतीतून उभारलेले आहे. एक नावाजलेले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळं काही चूक आहे असे म्हणण्याचे कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता. जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावे लागेल, ती चूक सुधारावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

Back to top button