क्राईम
ब्रेकिंग! पोलिस पुत्र खून प्रकरणात शॉकिंग ट्विस्ट

- राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान नाशिकच्या पंचवटी भागात २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता.
- पंजाबराव देशमुख वसतीगृहासमोर बुधवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गगन कोकाटे (वय २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. मृत तरुण सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा मुलगा होता. आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- गगन याचा त्याच्या प्रेयसीकडूनच काटा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत गगन कोकाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या प्रविण शहाजी कोकाटे यांचा मुलगा आहे. गगनचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते.
- मात्र गगन या महिलेला त्रास देत होता, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गगन त्या महिलेला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून शिक्षिका असलेल्या प्रेयसीने तिच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका टोळीशी संपर्क केला.
- त्यांना दोन लाख रुपयांची सुपारी देत गगनचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गगनची पहाटे हत्या घडवून आणली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून त्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



