क्राईम

ब्रेकिंग! बदलापूर अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा खतरनाक कारनामा

बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत.
बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपी अक्षय याचे तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहे.
आरोपी अक्षय याला कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिला हे विशेष. आरोपी राहात असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी त्याच्या घराची तोडफोड केली आहे.

Related Articles

Back to top button