महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवारांची सुरक्षा अचानक वाढवली

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोदी सरकारने आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. सीआरपीएफचे दहा जवान पवार यांच्यासोबत असणार आहेत. नुकताच पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले.
सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. तसेच पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.



