महाराष्ट्र
मोठी बातमी! बदलापूर अत्याचार प्रकरणाला नवे वळण

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, आपल्या मुलाला या सर्व प्रकरणात मुदाम अडकवण्यात आल्याचेही अक्षयच्या वडिलांनी म्हटले आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी हे दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला कसे वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अक्षय याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर अक्षय हा शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा. बाकी त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते, असे अक्षयच्या आईने म्हटले आहे. अक्षयची तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी असल्याचाही दावा अक्षयच्या वडिलांनी केला आहे.
पुढे अक्षयच्या आईला तो गतीमंद होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही, असे सांगितले. मात्र, त्याला छातीत दुखण्याचा त्रास होता. तसेच तो डोक्याने कमजोर असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासाठी त्याला काही औषधेदेखील सुरू होत्या, असे अक्षयच्या आईने सांगितले. आमचे कुटुंब हाऊसकिपिंगचे काम करायचे. आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचे कामही करायचो. आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आत जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो, अशी माहिती अक्षयच्या आईने दिली आहे.