सोलापूर

दुसऱ्या लग्नाची धमकी देत विवाहितेचा…

सोलापूर (प्रतिनिधी) विवाहितेला दुसरे लग्न करतो म्हणून धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ करत सासरकळच्या मंडळींनी संगनमत करून मारहाण केली. तसेच माहेरून २० हजार रुपये व अर्धा तोळा सोने घेऊन ये असे म्हणत घालून-पाळून बोलत जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३० जानेवारी २००२ ते २ मे २०११ पर्यंत फिर्यादी यांच्या सासरी घडली. याप्रकरणी आरती सुधाकर उर्फ बबन कदम (वय-३६,रा.स्वागत नगर,सिद्धेश्वर नगर भाग ३) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती सुधाकर कदम, सासू तारामती कदम, दीर जयराम कदम (रा.पोखरापूर तालुका मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहे.

Related Articles

Back to top button