महाराष्ट्र

ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेत बदल

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार हजार रुपये जमा करण्यात येत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा केले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. असाच एक बदल राज्य सरकारकडून करण्यात आला आहे, ज्याचा आता लाखो महिलांना फायदा होणार आहे.
ज्या महिलांनी या योजनेत 31 जुलैपूर्वी अर्ज केले आहेत, त्यांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात येत आहे. तर 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यात सप्टेंबरसह जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारकडून साडे चार हजार रुपये मिळणार आहेत.

Related Articles

Back to top button