हवामान

ब्रेकिंग! राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी-वा-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्हाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट तर उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button