क्राईम
ब्रेकिंग! यशश्री शिंदेच्या हत्येची पुनरावृत्ती
- उरण येथे यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीचा निर्घृण हत्या करण्यात आली. दाऊद शेख या आरोपीने यशश्री शिंदे हिची हत्या केली. दरम्यान उरण मधील जासई येथे शनिवारी सकाळी एका गोणीत मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी तीन तासांतच खुनाचा छडा लावला आहे. दत्तात्रय दुतुकडे असे मृताचे नाव असून, ते उरण येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते. पांढऱ्या रंगाची गोणी गावातील एका वाटसरूच्या लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांना संबंधित माहिती दिली. आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचलो आणि पंचनामा केला. तपासा दरम्यान, दुतुकडेचे परिसरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे आम्हाला समजले आणि आम्ही तपास सुरू केला, अशी माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.
- आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असताना पोलिसांना एक जोडपे पोत्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये आढळले. बालगंधर्व रामचंद्र गोराड (42) आणि त्यांची पत्नी चांगुणा (32, जासई) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. हा खून अनैतिक संबंधातून झाला आहे. मृत दत्तात्रय दुतुकडे यांचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तिच्या पतीनेच हत्येचा कट रचला होता, असे सहायक पोलिस आयुक्त (बंदर) विशाल नेहुल यांनी सांगितले. हे जोडपे पनवेल राज्य परिवहन बसस्थानकाजवळ सापडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.