महाराष्ट्र

संतापजनक! दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार

एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरातील या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन सुरू आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांना रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. यामुळे येथील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. मागील चार तासांपासून आंदोलन सुरू होते. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे आणखीच संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
या अत्याचाराच्या घटनेने प्रत्येकाचाच भडका उडाला आहे. रेल्वे परिसरातील आंदोलन चिघळल्यानंतर दुसरीकडे शाळेचे गेट तोडून आंदोलक आत घुसले. येथे त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर जोरदार शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी शाळेच्या आत घुसून नासधूस करण्यास सुरुवात केली. शाळेतील आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केल्याची माहिती मिळाली आहे. 

बदलापूर पूर्व येथील एका शाळेत अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींते शाळेच्या स्वच्छतागृहात अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास लावले. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतेही गांभीर्य न दाखवल्याने शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले.

Related Articles

Back to top button