ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल

सध्या सोलापूर शहर व परिसरात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. दरम्यान, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला अशाच एका नियमाची माहिती देणार आहोत, जो एक जूनपासून लागू झाला आहे. आता नवीन नियम आल्याने संपूर्ण प्रक्रियासुद्धा नवीन असणार आहे. सरकारने बदललेल्या या नवीन नियमात आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी आता पूर्णपणे वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत.
ड्रायव्हर लायसन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने एक जूनपासून नियम बदलले. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नियमांमध्ये हा बदल केला आहे. आता अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन टेस्ट देऊ शकतात.



